तुम्हाला माहितीये, पेट्रोल पाण्याप्रमाणं उकळलं तर काय होतं?
पेट्रोलला आगीपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण, हा एक ज्वलनशील पदार्थ आहे, पण हेच पेट्रोल पाण्याप्रमाणं उकळलं तर?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आग लागण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत असतात, पहिलं म्हणजे एक्सर्नल फ्लेम. म्हणजेच सिगरेट आणि तत्सम गोष्टी आणि दुसरं म्हणजे तापमान वाढीमुळं लागणारी आग.
पेट्रोल आग किंवा ठिणगीच्या संपर्कात आल्यामुळं आग धुमसते. त्याशिवाय पेट्रोलचं तापमान 280 अंशांच्याही पलिकडे गेलं तर ते पेट घेतं.
जेव्हा पेट्रोल गॅसवर पाण्यासारखं उकळलं जातं तेव्हा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. ते पेटही घेत नाही. उलटपक्षी त्याची वाफ होऊन ते हवेत उडून जातं.
पेट्रोल हे विविध हायड्रोकार्बनचं मिश्रण आहे. ज्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बनसारखे घटक मिळतात. ज्यामध्ये सुगंधी हायड्रोकार्बनचाही समावेश असतो.
पेट्रोल कसं तयार होतं या प्रक्रियेमध्ये डोकावल्यास काही बारकावे लक्षात येतात. जिथं कच्च्या तेलाला तापवून त्यातून पुढं गॅसोलीन, पेट्रोल आणि डिझेल मिळवलं जातं. ही प्रक्रिया फार मोठी असते.