अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी आपला वारसदार म्हणून मुलगा अलेक्झेंडर सोरोस याची निवड केली आहे.
जॉर्ज सोरोस यांना 5 मुलं आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या 37 वर्षीय मुलाला आपला वारसा पुढे नेण्यासाठी निवडलं आहे.
जॉर्ज सोरोस सध्या 92 वर्षांचे आहेत. त्यांनी एकूण तीन लग्नं केली आहेत.
जॉर्ज सोरोस यांचं तब्बल 25 बिलियन डॉलरहून अधिक किंमतीचं साम्राज्य आहे.
जॉर्ज सोरोस जगभरातील राजकारणावर भाष्य करत असतात. तसंच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात.
दरम्यान जॉर्ज सोरोस यांचं नाव अनेक वादांशीही जोडलं गेलं आहे.
1992 मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या स्थितीसाठी जॉर्ज सोरोस यांनाच जबाबदार धरण्यात आलं होतं.
जॉर्ज यांचा मुलगा अलेक्झेंडर याने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून आपलं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं आहे.
जॉर्ज यांना पाच मुलं असून त्यांची नावं अलेक्झेंडर, एंड्रिए या, ग्रेगरी, रॉबर्ट आणि जोनाथन अशी आहेत.