नेपाळ

तुम्हाला माहितीये का, भारतातूनही अशाच काही देशांमध्ये जाण्यासाठी तुम्ही विमानप्रवासाऐवजी रस्तेमार्गांचा पर्याय निवडू शकता. यातला पहिला देश आहे, नेपाळ. नवी दिल्लीपासून नेपाल साधारण 1125 किमीवर असून, इथं जाण्यासाठी तुम्हाला साधारण दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो.

थायलंड

थायलंड या पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या देशापर्यंत रोडट्रीप करायची असल्यास तुम्हाला 4198 किमीचं अंतर ओलांडावं लागलंत. नवी दिल्ली ते इंफाळ, तिथून मोरेह, काले, बागान, इन्ले लेक असा प्रवास करत तब्बल 71 तासांनंतरतुम्ही थायलंडमध्ये पोहोचता.

भूतान

नवी दिल्लीपासून भूतान देश 1546 किमी अंतरावर आहे. या रस्तेमार्गावरील प्रवासात तुम्ही आराम, गुवाहाटी, उत्तर प्रदेश ओलांडत Phuntsholing या भूतानमधील गावी पोहोचता. इथं जाण्यासाठी 32 तास म्हणजेच जवळपास 3 दिवसांचा कालावधी लागतो.

व्हिएतनाम

व्हिएतनाम या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चेत असणाऱ्या देशात रोडट्रीप करत येणार असाल तर तुम्ही इथं नवी दिल्लीपासून 5162 किमी अंतराचा प्रवास करता. म्यानमानर, थायलंड आणि लाओस अशा सीमा ओलांडत तुम्ही इथं पोहोचता.

बांगलादेश

रोड ट्रीपसाठीचा पुढील पर्याय बांगलादेश. नवी दिल्ली ते ढाकापर्यंतचं अंतर 1850 किमी असून, इथं जाताना तुम्ही 35 तास म्हणजेच 3 दिवस खर्ची घालता.

मलेशिया

मलेशियापर्यंतची रोडट्रीप करायची असल्यास तुम्हाला 101 तास म्हणजे साधारण 8 दिवसांचा कालावधी लागू शकतो. नवी दिल्लीपासून हे अंतर 5760 किमी इतकं आहे.

सिंगापूर

सिंगापूरपर्यंत पोहोचताना तुम्ही रोडट्रीपच्या माध्यमातून म्यानमार, थायलंड आणि मलेशिया हे तीन देश ओलांडता. नवी दिल्लीपासून 6188 किमीचं अंतर पार करताना इथं तुम्हाला 9 दिवसांचा कालावधी लागतो.

म्यानमार

नवी दिल्लीपासून 2959 किमी अंतरावर असणाऱ्या म्यानमारपर्यंत रोडट्रीप करत पोहोचताना तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम, नागालँड, मणिपूर असे प्रांत ओलांडता. हा प्रवास तुम्ही 64 तास म्हणजे 6 दिवसांत पूर्ण करू शकता.

तुर्की

तुर्की या अतिशय सुरेख देशापर्यंतही तुम्ही रोडट्रीप करत पोहोचू शकता. इथं येण्यासाठी तुम्हाला नवी दिल्लीपासून 4546 किमीचं अंतर ओलांडावं लागतं. 59 तासांच्या या प्रवासासाठी तुम्ही 6 दिवस रस्त्येमार्गानं विविध प्रदेश ओलांडता.

श्रीलंका

श्रीलंकेपर्यंतचा प्रवासही तुम्ही रस्तेमार्गानं करू शकता. इथं जाण्यासाठी तुम्हाला 3533 किमी अंतराचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 78 तास म्हणजेच 7 तासांचा कालावधी लागतो.

VIEW ALL

Read Next Story