प्रेम ही अशी भावना आहे जी शब्दात मांडता येत नाही. प्रेमाच्या बाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात 27 प्रकारचं प्रेम अनुभवतो.
प्रेम मन आणि मेंदूशी निगडीत असते. यामुळे आपल्या शरीरात 27 प्रकारच्या प्रेम भावना निर्माण होतात.
फिनलंडच्या आल्टो विद्यापीठातील संशोधकांनी 27 प्रकारच्या प्रेम भावनांबाबत संशोधन केले आहे.
27 प्रकारच्या प्रेम भावना एकमेकांपेक्षा वेगळ्या असून ते त्या प्रकारानुसार अधिक बलवान आणि परिस्थितीनुसार कमकुवत असतात.
27 प्रकारच्या प्रेम भावनापैंकी आई वडिल, भाऊ बहिण आणि मनपसंत जोडीदार यांच्या प्रती असलेल्या प्रेमभावना खूप मजबूत असतात.
जोडप्यांमधील रोमँटिक प्रेम, लैंगिक प्रेम, आई-वडिल, भावंड, मित्र मैत्रिणी, अनोळखी व्यक्ती, पक्षी-प्राणी, निसर्ग, देव आणि स्वतःवरील प्रेम अशा 27 प्रकारच्या प्रेमाचा अनुभव प्रत्येक व्यक्ती घेतो.