भारतात सोन्याच्या किंमतीचा दर हा दिवसेंदिवस वाढत आहे.
लग्नसराई, सण उत्सवाच्या काळात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसते.
याकाळात एवढं महागलेलं सोनं कसं घ्यायचं, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो.
पण पाकिस्तानात सोन्याची किंमत पाहून तुम्हाला निश्चितच धक्का बसेल.
पाकिस्तानात सोन्याची किंमत भारताच्या तुलनेत खूपच जास्त आहे.
पाकिस्तानात एक तोळा सोन्याची किंमत जवळपास 2 ते सव्वादोन लाख इतकी आहे.
तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 2 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.
तसेच पाकिस्तानात 21 कॅरेट सोन्याचा दर 19 लाख इतका आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 16 लाखांच्या आसपास आहे.