विमानाचा पायलटही हॉर्न वाजवतो का? रंजक आहे उत्तर

Jun 15,2024

उड्डाण

विमानप्रवास करत असताना इतक्या महाकाय विमानाला योग्य ठिकाणी नेणाऱ्या आणि हवेत या विमानासह उड्डाण भरणाऱ्या वैमानिकाचं अर्थात पायलटचं प्रचंड कौतुक वाटतं.

Air Traffic

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की हवेतील या प्रवासामध्ये कधी Air Traffic होतं का? वैमानिक कधी हॉर्नचा वापर करतात का? इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वैमानिकांसाठी कॉकपिटमध्ये हॉर्नची तरतूद असते का?

हॉर्न

विमानांना हॉर्न नसला तरीही पायलटकडे अशा सुविधा असतात जिथं त्यांना जमिनीवर असणाऱ्या कर्मचारी किंवा विमानाच्या इतर वैमानिकांना संकेत देता येतात.

सिग्नल

विमानांमध्ये सिग्नल, लाईट आणि रेडिओ कम्युनिकेशन्स अशा सुविधा असतात. रनवेववर असताना पायलट या माध्यमातून संवाद साधत माहिती देतात.

टक्कर

विमानांमधील टक्कर आणि कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी ही माध्यमं अतिशय फायद्याची ठरतात.

इशारा

काही विमानतळांवर पायलट जमिनीवरील कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी विमानाच्या लाईटची मदत घेतात. रात्रीच्या वेळी या लाईट अतिशय फायदेशीर ठरतात.

VIEW ALL

Read Next Story