सूर्यमालेतील 9 ग्रहांच्या 297 चंद्रांपैकी अर्धाहून अधिक चंद्र एकाच ग्रहाभोवती फिरतात

सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता ठाऊक आहे का? जाणून घेऊयात रंजक माहिती

चांद्रयान-3 कडे संपूर्ण जगाचं लक्ष

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची जगभरामध्ये चर्चा आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोहीम नेणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे.

9 ग्रहांना एकूण 297 चंद्र

मात्र आपल्या सूर्यमालेतील 9 ग्रहांना एकूण 297 चंद्र म्हणजेच नैसर्गिक उपग्रह आहेत.

20 चंद्रांना स्वत:चं गुरुत्वाकर्षण

सूर्यमालेतील 20 चंद्र म्हणजेच उपग्रह एवढे मोठे आहेत की त्यांना त्यांची स्वत:ची गुरुत्वाकर्षण कक्षा आहे.

सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता?

पृथ्वीला एकच चंद्र असला तरी सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता ठाऊक आहे का? जाणून घेऊयात याचबद्दल...

सूर्याच्या सर्वात जवळच्या ग्रहाला चंद्रच नाही

बुध ग्रहाला एकही चंद्र नाही. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.

पृथ्वीच्या शेजाऱ्याला एकही चंद्र नाही

पृथ्वीचा शेजारी असलेला शुक्र ग्रहालाही एकही चंद्र नाही.

चंद्र असलेला सूर्यापासूनच सर्वात जवळचा ग्रह

सूर्यापासून सर्वात जवळ असलेला आणि नैसर्गिक चंद्र असलेला पृथ्वी हा क्रमवारीनुसार पहिला ग्रह आहे.

मंगळाला 2 चंद्र

मंगळ ग्रहाला 2 चंद्र आहेत. 2 चंद्र असलेला मंगळ हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे.

गुरु सर्वात मोठा ग्रह पण...

गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असला तरी तो सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह नाही.

गुरुला किती चंद्र?

गुरुला एकूण 95 चंद्र आहेत. हे चंद्र फार लहान मोठ्या आकाराचे आहेत.

सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह

शनी ग्रह हा सर्वाधिक चंद्र असलेला सूर्यमालेतील ग्रह आहे. शनीला तब्बल 146 चंद्र आहेत.

अर्ध्याहून अधिक चंद्र शनीभोवती

म्हणजेच सूर्यमालेतील एकूण चंद्रांच्या संख्येपैकी अर्ध्याहून अधिक चंद्र शनीच्या अवतीभोवती फिरतात.

सर्वाधिक चंद्रांबाबतीत युरेनस तिसऱ्या स्थानी

युरेनसला एकूण 27 चंद्र आहेत. चंद्रांच्या संख्येबाबतीत युरेनस हा तिसऱ्या स्थानी आहे.

नेपच्यूनला किती चंद्र?

नेपच्यूनला एकूण 14 चंद्र आहेत.

प्लुटोलाही 5 चंद्र

बटूग्रह म्हणून सूर्यमालेमधून बाहेर काढण्यात आलेल्या प्लुटोलाही लहान आकाराचे 5 चंद्र आहेत.

VIEW ALL

Read Next Story