हनिमून

हनिमूनसाठी जा परदेशात, तेसुद्धा खिशाला परवडणाऱ्या दरात; पाहा ठिकाणांची यादी

एखाद्या ठिकाणाच्या शोधात आहात का?

तुम्हीही अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात आहात का? हनिमून आणि परदेशवारी असा योग साधण्याच्या विचारात तुम्ही असाल तर पाहा काही कमाल ठिकाणांची यादी.

कोस्टा रिका

समुद्र किनारा, रेन फॉरेस्ट आणि वन्यजीवांना जवळून पाहण्याची संधी तुम्हाला इथं मिळेल.

पोर्तुगाल

रोमँटिक पोर्तुगाल अनुभवण्यासाठी लिस्बन आणि पोर्टो ही शहरं उत्तम पर्याय आहेत.

क्रोएशिया

निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि खिशाला परवडणाऱ्या दरात तुम्ही क्रोएशियाही फिरून येऊ शकता.

मोरक्को

वाळवंट आणि एक अनोखं विश्व आणि खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत मोरक्कोलाही भेट देऊ शकता.

पेरु

पेरुला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथं तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल.

बुडापेस्ट, हंगेरी

खिशाला परवडणारे दर, कमाल खाद्यसंस्कृती आणि थर्मल बाथ असा अनुभव घेण्याच्या विचारात असाल तर बुडापेस्ट एक उत्तम पर्याय.

ग्रीस

निळाशार समुद्र आणि जीभेवर चव रेंगाळत राहील अशी खाद्यसंस्कृती तुम्ही ग्रीसमध्ये अनुभवू शकता. तेसुद्धा परवडणाऱ्या किमतीत.

निकारागुआ

सॅन जुआनमधील निकारागुआमध्ये तुम्ही जोडीदारासोबत काही निवांत क्षणांचा आनंद घेण्यासोबतच येथील एकाहून एक सुंदर शहरं फिरण्याचा आनंदही घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story