ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणूक झाली असून यात लेबर पार्टी विजयी झाली.
स्वत:ची सीट जिंकली असली तरी ऋषी सुनक पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले.
त्यांनी कियर स्टारमर यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा दिल्या.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना किती पगार मिळत असेल?
ब्रिटनच्या पंतप्रधानांना 2 वेगवेगळे वेतन दिले जातात. एक खासदार असल्याचे तर दुसरे सरकारचे नेतृत्व केल्याचे.
ब्रिटन मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधानांना खासदार म्हणून मिळणारा पगार भारतीय चलनानुसार 97.20 लाख रुपये इतका होतो.
तर सरकारचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय चलनानुसार 80.28 लाख रुपये मिळतात.
तसेच प्रवास खर्च, कर्मचारी वेतन आणि इतर सुविधाही त्यांना दिल्या जातात. निवृत्तीनंतरही त्यांना आर्थिक फायदे मिळतात.
पंतप्रधानांना निवृत्तीनंतर त्यांच्या पगाराच्या 25 टक्के रक्कम दिली जाते.