अमेरिकेत हत्येच्या आरोपातील कैद्याला नायट्रोजन गॅस देऊन मृत्यूदंड देण्यात आला. केनेथ इयूजीन स्मिथ असं या आरोपीचं नाव होतं.

नायट्रोजन गॅसने एखाद्या कैदयाला मृत्यूदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. या कैद्यावर महिलेच्या हत्येचा आरोप होता.

आरोपी केनेथ इयूजीन स्मिथने सुपारी घेऊन एका महिलेची हत्या केली होती. 1998 ची घटना होती. याप्रकरणात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपी स्मिथला आधी रेस्पिरेटर मास्क लावण्यातआला. त्यानंतर त्याच्या खोलीतत नायट्रोजन गॅस सोडण्यात आला.

नायट्रोजन गॅसमुळे माणसाच्या शरीरातील ऑक्सिजनची कमी होऊ लागते. त्यानंतर तो आपली शु्द्ध हरपतो. त्यानंतर काही मिनिटात मृत्यू होतो.

अमेरिकेच्या अलाबामात आरोपी स्मिथला नाट्रोजन गॅस देऊन मृत्यू देण्यात आला. ही शिक्षा जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

आरोपी स्मिथला याआधी विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूची शिक्षा देण्याचा आदेश देण्यात आला होता. पण डॉक्टरांना त्याची नस न सापडल्याने ही शिक्षा बारगळली.

VIEW ALL

Read Next Story