गूढ उलगडणार?

87 वर्षानंतर सापडलं समुद्रात पडलेलं विमान! 'त्या' महिला वैमानिकाचं काय झालं? गूढ उलगडणार?

आजही चर्चेचा विषय

अमेलिया इयरहार्ट असं या महिलेचं नाव असून, 1937 मध्ये घडलेल्या एका घटनेमुळं तिचं नाव आजही चर्चेचा विषय ठरतं.

विमान सापडल्याचा दावा

87 वर्षांपूर्वी हरवलेलं अमेलियाचं विमान तब्बल 87 वर्षांनंतर सापडलं असून, ते पॅसिफिक महासागरात सापडल्याचा दावा केला जात आहे.

सोनार फोटो

अमेरिकेच्या वायुदलातील माजी Intelligance Officer यांच्याकडून हा दावा करण्यात येत आहे. खोल समुद्रात संशोधन करणाऱ्या एका कंपनीकडून एक सोनार फोटो सर्वांपुढे आणण्यात आला आहे.

जगभ्रमंती

अमेरिकन महिला पायलट अमेलिया इयरहार्ट तिच्या विमानानं जगभ्रमंतीसाठी निघाली होती.

दुर्दैवानं...

त्या काळात तिची ही मोहिम यशस्वी ठरली असती, तर असं काम करणारी ती पहिली महिला ठरली असती. दुर्दैवानं तसं होऊ शकलं नाही.

शोध मोहिमा

विमान नाहीसं झालं खरं पण, त्यानंतर सलग सहा वर्षांसाठी त्याचा शोध घेण्याचं काम सुरु होतं. पण, त्यात अनेक मोहिमा अपयशी ठरल्या, अमेलियाचाही शोध लागलाच नाही.

पॅसिफिक महासागरातील गूढ

असं म्हटलं जातं की, अमेलियाचं विमान हॉलँड आयलंडपाशी, पॅसिफिक महासागरात कोसळलं होतं. आता याच विमानाबद्दल केला जाणारा हा दावा कितपत खरा आहे याकडे अनेकांचच लक्ष आहे.

VIEW ALL

Read Next Story