'ही' 5 झाडं लावलीत तर घरातील ऑक्सिजन आणि थंडावा नक्कीच वाढेल

घर थंड करण्यासाठी नैसर्गिक मार्ग

घर जर नैसर्गिक रित्या थंड करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला फ्रेश फील होतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही झाडांविषयी सांगणार आहोत, ज्यानं घर लवकरच थंड होईल.

कोरफड

कोरफड हे फक्त आपल्या त्वचा आणि केसांसाठी नाही तर घरातील गर्मी कमी करण्यासाठी देखील महत्त्वाचं आहे.

काय काम करते कोरफड

कोरफड हे हवेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यापासून घरात असलेली ऑस्किजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करते.

स्नेक प्लॉंट

स्नेक प्लांट हे आजकाल आपल्याला सहजपणे अनेकांच्या घरात पाहायला मिळतात. स्नेक प्लॉंट आपल्या घरातील ऑक्सिनपातळी कायम ठेवण्याचे काम करते आणि त्यामुळे हवेतील गरमी देखील कमी होते.

गोल्‍डन पोथोज

गोल्डन पोथोज हे झाड घरातील थंडावा कायम ठेवण्याचे काम करतो. गोल्डन पोथोज हे मनी प्लांटचाच एक प्रकार आहे. गोल्डन पोथोज हे हवेतील धूळ आणि कार्बनला पटरन कमी करत फिल्टर करण्याचं काम करेत.

बेबी रबर प्‍लांट

बेबी रबर प्‍लांट खूप लवकर हवेतील कार्बन डायऑस्काइड कमी करेत आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते.

फाइकस

फाइकस ट्री हे खूप सोप्या पद्धतीनं कुंडीत लावू शकता आणि घरात ठेवू शकता. या रोपाच्या मदतीनं घर थंड राहण्यापासून ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी मदत करते.

झाडं कशी करतात घरातील गर्मी कमी

जेव्हा झाडं ऑक्सिजन लेव्हल वाढवतात तेव्हाच घरातील गरमी कमी होती.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Pexel)

VIEW ALL

Read Next Story