योग्य जोडीदार मिळत नसल्याने एका 42 वर्षीय महिलेने स्वत:शीच लग्न केलं आहे.

या लग्नात तिचे जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते.

ब्रिटनमध्ये ही घटना घडली असून, सारा विलकिनसन असं या महिलेचं नाव आहे. योग्य जोडीदार शोधून आपण आता थकल्याचं तिचं म्हणणं आहे.

साराने मागील 20 वर्षात बचत केलेले 10 लाख रुपये लग्नावर खर्च केले.

सफोल्क येथे हे लग्न पार पडलं. लग्नात एकूण 40 पाहुणे उपस्थित होते.

लॉकडाउनमध्ये सारा 40 वर्षांची दिली. साराने यावेळी स्वत:ला हिऱ्याची अंगठी घेण्याचा विचार केला.

यानंतर तिच्या मनात स्वत:शी लग्न कऱण्याचा विचार आला. यानंतर तिने जोडीदार शोधणं बंद केलं.

साराने लग्नात पांढरा गाऊन घातला होता. तसंच केकबर बेडकाला किस करतानाची नववधू दाखवण्यात आली होती.

लग्नाच्या दिवशी सारा आईचा हात पकडून विवाहस्थळी पोहोचली होती. आपण फार आनंदी असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

VIEW ALL

Read Next Story