2013 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मात्र त्यानंतर त्यांच्यात मतभेद वाढू लागले आणि त्यांनी लग्नाच्या 9 वर्षानंतर 2018 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सचिन-जुहीच्या 10 वर्षांच्या मुलीचा ताबा जुहीकडे आहे.
सचिन श्रॉफ हा दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार असून 2009 मध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री जुही परमारशी पहिलं लग्न केलं होत.
सचिन श्रॉफचं अरेंज मॅरेज असून सचिनची होणारी पत्नी ग्लॅमर विश्वातील नाही. ती इव्हेंट ऑर्गनायझर आणि इंटेरिअर डिझायनर असल्याचं समजतंय.
मुंबईमध्ये त्याचा लग्नसोहळा पार पडणार असून काही मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात येणार आहे.
नवीन तारक मेहता म्हणजे खऱ्या आयुष्यातील सचिन श्रॉफ हा 25 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहे.