मोबाईल चार्ज केलाच नाही, तर तो कामच करणार नाही. त्यामुळं जितका मोबाईल महत्त्वाचा तितकाच त्याचा चार्जरही. सर्वच मोबाईलसोबत येणारे चार्जर हे कायम काळ्या किंवा पांढऱ्या रंगांचे असतात. यामागं काय कारण?
काळा रंग कायम उर्जा शोषून घेणाऱ्या एमिटरचं काम करतो, ज्याची एमिशन वॅल्यू 1 असते. म्हणजेच काळा रंग उष्णतेला जास्तीत जास्त वेळ धरून ठेवतो. यामुळं विद्युत उपकरणं उत्तमरित्या काम करतात.
काळ्या रंगात मिळणारी उत्पादनं तुलनेनं स्वस्त असतात. इतर रंगांच्या तुलनेत काळ्या रंगाचं पेंटिंग आणि कोटिंग स्वस्त असल्यामुळं अनेक कंपन्या काळ्या रंगांच्या चार्जरला प्राधान्य देतात.
पांढऱ्या चार्जरविषयी सांगावं, तर यामध्ये रिफ्लेक्टर क्षमता असते ज्यामुळं बाहेरील उष्णता चार्जर शोषून घेत नाही.
बाहेरून येणारी उष्णता पांढरा चार्जर बाहेरच रोखून धरतो आणि तापमान नियंत्रित ठेवतो.
पांढऱ्या रंगाचा चार्जर दिसायलाही उत्तम दिसतो. ज्यामुळं अनेक कंपन्या चार्जरसाठी पांढऱ्या रंगालाच कायम पसंती देताना दिसतात.