प्रत्येक नागरिकाची एक वेगळी ओळख असणे गरजेचे आहे.
भारताची लोकसंख्या 141 कोटीपेक्षाही जास्त असून त्यात दरवर्षी वाढ होत आहे.
141 कोटी अंकात लिहिण्यासाठी 10 आकड्यांची गरज लागते.
याचा विचार करूनच आधार कार्डवरील नंबर 12 अंकी ठेवण्यात आला आहे.
आधार नंबर हा 12 अंकी असल्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सहज एक वेगळी ओळख दिली जाऊ शकते.
आधार कार्डच्या मदतीने वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेणारे नागरिक ओळखता येऊ शकतात.
यामुळे ड्युप्लीकेट आधार कार्ड तयार होण्यापासून थांबवता येते.
पण लक्षात ठेवा 12 अंक असलेला प्रत्येक नंबर आधार नंबर असेलच असे नाही. त्यामुळे आधारकार्ड बघून ओळख पटवून घेताना आधी आधार नंबर व्हेरिफाय करून घ्या.