मोबाईलचा पॅटर्न पासवर्ड विसरायला होतं असं अनेकदा आपल्यासोबत घडलं आहे. अशावेळी फोन अनलॉक कसा करावा? असा प्रश्न पडतो. मात्र ही ट्रिक वापरुन तुम्ही अगदी मिनिटभरात अनलॉक करु शकाल.
तुम्ही अँड्रोइड फोन वापरत असाल आणि त्याचा पासवर्ड विसरलात तर काळजी करु नका. सगळ्यात पहिले फोन स्विच ऑफ करा.
स्विच ऑफ केल्यानंतर एक ते दोन मिनिटे थांबून वाट पाहा
त्यानंतर व्हॉल्यूम बटणचे खालील बटण आणि पॉवर बटण एकत्रच प्रेस करा
त्यानंतर तुमचा फोन रिकव्हरी मोडवर जाईल. त्यानंतर तुम्हाला फॅक्ट्री रिसेट बटणावर क्लिक करायचे आहे.
डेटा क्लीन केल्यानंतर तिथे दिलेल्या Wipe Cacheवर क्लिक करा
जवळपास एक मिनिटापर्यंत वाट पाहून नंतर फोन रिस्टार्ट करा
स्टार्ट होताच फोन अनलॉक होईल, मात्र हे लक्षात घ्या की, या प्रोसेसमध्ये फोनमध्ये असलेले लॉगइन आणि डाऊनलोड असलेले अॅप्स डिलीट होतील