स्मार्टफोनच्या तळाशी असलेले हे लहान छिद्र काय काम करते?

स्मार्टफोनच्या तळाशी असलेले हे लहान छिद्र ज्याला सहसा आपण मायक्रोफोन समजतो तर हा मायक्रोफोन नसून 'मायक्रोफोन ग्रिल' असते.

हे छिद्र 'नॉईज कॅन्सलेशन मायक्रोफोन' कव्हर करते त्यामुळे फोनवर बोलत असताना आसपासचा आवाज कमी करते. हा मायक्रोफोन मुख्य मायक्रोफोनच्या सोबतीने काम करतो.

तुम्ही जेव्हा कॉल करता तेव्हा नॉइज कॅन्सलेशन मायक्रोफोन आजूबाजूचा आवाज कव्हर करून नंतर मुख्य मायक्रोफोनने उचललेल्या स्पीचमधून वेगळं करण्यासाठी विशेष अल्गोरिदम वापरतं

या तंत्राज्ञानामुळे तुम्हाला स्पष्ट आणि गोंगाटमुक्त कॉल करण्यास मदत होते.

जर तुम्ही मायक्रोफोन ग्रिल काढून टाकले तर त्याचा परिणाम तुमच्या कॉलच्या गुणवत्तेवर होऊ शकतो.

आजूबाजूचा आवाज स्पष्टपणे कॉलवर ऐकू येईल ज्यामुळे तुम्हाला कॉल वर बोलण्यास व्यत्यय येऊ शकतो.

हे काढल्याने कॉलच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. पण सर्वच स्मार्टफोनमध्ये नॉइज कॅन्सलेशन मायक्रोफोन नसतो.

VIEW ALL

Read Next Story