कार खरेदी करताना लोक फीचर्स, किंमत, मायलेजसोबतच कारच्या रंगाबद्दल देखील खूप विचार करत असतात.
कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या कार बनवत असते. मात्र, तुम्ही बहुतेक पांढऱ्या रंगाच्या गाड्या रस्त्यावर फिरताना बघत असाल.
देशातच नाही तर परदेशात देखील लोक पांढऱ्या रंगाच्या कार खरेदी करताना लोक दिसत असतात.
पांढऱ्या कारच्या किंमती स्वस्त असतात. तसेच रंग देण्याचा खर्च देखील इतर रंगांच्या तुलनेत कमी असतो.
त्यासोबत पांढऱ्या रंगाची कारवर काही स्क्रॅच असल्यास, हा रंग तो झाकण्यात यशस्वी ठरतो.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील पांढऱ्या रंगाची कार खरेदी करणे उत्तम आहे.
हलक्या रंगाच्या गाड्यांचे आतील भाग जास्त गरम होत नाही. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या कार जास्त उष्णता देत नाहीत.