यामाहा एमटी 15 च्या विक्रीत वेगाने वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये या बाईकच्या 13405 युनिट्सची विक्री झाली आहे, जी मागील वर्षाच्या ऑक्टोबरच्या 8736 च्या तुलनेत 53 टक्के जास्त आहे.
Yamaha FZ चौथ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबरमध्ये या बाईकच्या 17,874 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या 18,000 युनिट्सच्या तुलनेत हा आकडा थोडा कमी आहे.
होंडा युनिकॉर्न तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबरमध्ये युनिकॉर्नच्या 31,768 य़ुनिट्सची विक्री झाली आहे, जी गतवर्षीच्या 16,404 च्या तुलनेत 93 टक्के जास्त आहे.
बजाज पल्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पल्सरच्या 57,198 युनिट्सची विक्री झाली होती. यावर्षी 36,336 युनिट्सची विक्री झाली आहे.
टीव्हीएस अपाचे पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने एकूण 50,097 युनिट्सची विक्री केली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात बाईकच्या 39,187 युनिट्सची विक्री झाली होती. यावेळी 27 टक्के वाढ झाली आहे.