टीव्ही पाहताना अनेकजण लाईट बंद करतात. तर, काहींना कमी प्रकाशात टीव्ही पाहायला आवडतं.
अंधारात टीव्ही पाहिल्यानं डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. दृष्टी कमकुवत होऊ लागते.
डोळ्यांवर पडणारा प्रकाश आणि अंधार यांमध्ये बरंच अंतर असतं. त्यामुळं दृष्टीदोष जाणवतो.
अती उजेडात टीव्ही पाहिल्यास टीव्हीच्या स्क्रीनवरील उजेड डोळ्यावर पडून यामुळं डोळ्यांवर दबाव पडतो.
टीव्ही पाहताना कायम थोडासा उजेड असावा. यामुळं डोळ्यांवर फार दबाव येत नाही.
घरात साधारण 50 ते 55 इंचांचा टीव्ही असल्यास त्यापासून 10 फुटांच्या अंतरावर बसून तो पाहावा.