फोनची गरज इतकी वाढली आहे की त्याची बॅटरी कधीही कमी होऊ नये असे लोकांना वाटते. हेच कारण आहे की काही लोक असे आहेत जे बॅटरी थोडी कमी झाली तरी ती वारंवार प्लग करतात.
पण असे करणे योग्य आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. खूप कमी लोक असतील ज्यांना माहित असेल की फोन चार्जिंगवर किती वेळ ठेवावा.
तुमचा फोनची बॅटरी चांगली राहावी यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला 20 टक्के असताना प्लग इन करणे आणि 80-90 टक्क्यांपर्यंत चार्ज करणे.
जर तुम्ही फास्ट चार्जिंग वापरत असाल तर हे महत्वाचे आहे, कारण 0 टक्क्यांवरून चार्ज केल्याने बॅटरी लक्षणीयरित्या गरम होते आणि 80 टक्क्यांपेक्षा जास्त, फास्ट चार्जिंग कमी होते.
जर तुम्ही तुमचा फोन जास्त काळ न वापरण्याचा विचार करत असाल तर तो अर्धा चार्ज करणे हा उत्तम पर्याय आहे. अॅपल कंपनी तुमची बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी 50 टक्के पर्यंत चार्ज करण्याची शिफारस करते.
त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या मोबाइल फोनच्या बॅटरी थंड, कोरड्या जागी ठेवण्यास सांगतात. स्वस्त चार्जर फोन आणि त्याच्या युजर्ससाठी असुरक्षित आहेत.
बॅटरीतील घटक योग्य प्रकारे इन्सुलेटेड नसल्यामुळे शॉर्ट सर्किट आणि आग लागण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे बनावट चार्जर वापरणे योग्य नाही.