सोशल मीडिया

सोशल मीडियावरील कमाईवरही लागणार Tax; काही नवं सुरु करण्याआधी हे वाचा...

असंख्य युजर्स

Social Media : सोशल मीडिच्या उपलब्धतेमुळं अनेक नवनवीन गोष्टी संपूर्ण जगानं पाहिल्या. बहुविध ठिकाणं, तिथल्या संस्कृती आणि त्या ठिकाणचं राहणीमान सहजपणे या माध्यमातून असंख्य युजर्सपर्यंत पोहोचलं.

सोशल मीडियातून पैसे

या माध्यमामुळं कोणाचं मनोरंजन झालं, कोणाला काहीतरी नवं शिकायला मिळालं तर, कोणी चक्क याच माध्यमातून पैसेही कमवले.

लाईक, शेअर आणि कमेंट

लाईक, शेअर आणि कमेंट करा, सब्सक्राईब करा हे असं म्हणत तुमच्याआमच्यासमोर येणारे अनेक व्लॉगर्स किंवा सोशल मीडिया इंफ्लुएन्सर्स तितकाच नव्या पद्धतीचा कंटेंट त्यांच्या दर्शकांना देऊ लागले.

तुम्हीही कमाई करायच्या विचारात ?

अशा या सोशल मीडियावरून तुम्हीही कमाई करायच्या विचारात असाल, काहीतरी नवं सुरु करणार असाल तर आधी हे पाहून घ्या. कारण, X (आधीचं ट्विटर) वरून आता जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जीएसटी कायद्यानुसार 18 टक्के वस्तू आणि सेवा कर आकारला जाणार आहे.

जीएसटी लागू

20 लाखांच्या वर हे उत्पन्न गेल्यास त्यावर जीएसटी लागू होणार आहे. ज्यासाठी अशा युजर्सनी जीएसटी नोंदणी करणंही अपेक्षित आहे.

उत्पन्नमर्यादा

मणिपूर, मिझोरम आणि मेघालय या राज्यांसाठी एकूण उत्पन्नमर्यादा 10 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

सोशल मीडिया पोस्ट

त्यामुळं जाहिरात असो वा सोशल मीडियाची एखादी पोस्ट. माध्यम कोणतंही असो, तेथून तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नावर इनकम टॅक्स विभागाची नजर असणार आहे हे विसरून चालणार नाही.

VIEW ALL

Read Next Story