रॉयल एनफिल्डच्या बाईकची तरुणांमध्ये किती क्रेझ आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या बाईकवरुन फिरणं म्हणजे एक वेगळाच थाट आहे.

रॉयल एनफिल्ड काळासह बदलत असून, त्याच्या किंमतीतही वाढ होऊ लागली आहे.

रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त बाईक Hunter ची किंमतही 1.50 लाखांपासून सुरु होते. बुलेट आणि क्लासिकसारख्या मॉडेलला तर 2 लाख खर्च करावे लागतात.

पण आता रॉयल एनफिल्ड आपल्या ग्राहकांसाठी रेंटल प्रोग्राम चालवत आहे. जर तुम्हाला मोजक्या वेळेला बाईकची गरज भासत असेल तर तुम्हाला याचा फायदा आहे.

रॉयल एनफिल्ड रेंटल प्रोग्राम अंतर्गत तुम्ही फक्त 800 रुपयांत बाईक भाड्याने घेत आपल्या आवडत्या दुचाकीवरुन फिरण्याचा आनंद लुटू शकता.

यामध्ये बुलेट, क्लासिक, हिमालयन अशा अनेक दुचाकी उपलब्ध आहेत.

रॉयल एनफिल्डने देशातील 27 शहरांमध्ये हा प्रोग्राम सुरु केला आहे. मॉडेल आणि लोकेशननुसार हे दर आकारण्यात आले आहेत.

दिल्ली, जैसलमेर, लेह, मनाली, हरिद्वार, देहरादून, जयपूर, चेन्नई, नैनीताल, अहमदाबाद, गोवा, सिलिगुडी, भुवनेश्वर, बंगळुरुसारख्या शहरात ही सुविधा आहे.

याशिवाय उदयपूर, शिमला, हैदराबाद, मुंबई, त्रिवेंद्रम, कोची, चंदीगड, ऋषिकेश, विशाखपट्टणमसारख्या शहरात तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

बाईक बूक करण्यासाठी तुम्हाला रॉयल एनफिल्डच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. लोकेशनप्रमाणे माहिती भरुन तुम्ही बाईक भाड्याने घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story