बजाज ऑटोने जगातील पहिली CNG बजाज फ्रीडम बाईक लॉन्च केलीय.
दुहेरी इंधन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बाईक पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालते.
कंपनीने फ्रीडम 125 बाईक तीन प्रकारांमध्ये सादर केली असून तिची किंमत 95,000 रुपये निश्चित केली आहे.
बजाजच्या माहितीनुसार फ्रीडम CNG बाईक 5 वर्षात 75,000 रुपयांपर्यंत बचत करु शकते.
50 किमी प्रवास करण्यासाठी तुमची बाईक 50 किमीचा मायलेज देत असेल तर मासिक रनिंग कॉस्ट अंदाजे 2,373 रुपये असेल.
तेच अंतर फ्रीडम 125 चा मासिक धावण्याचा खर्च 925 रुपये असेल. या बाईकमध्ये 2 लिटरची पेट्रोल टाकी आणि 2 किलोचा CNG सिलेंडर दिला आहे.