आशिष चंचलानी हा यूट्यूबवर कॉमेडी व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. बनवतात. त्याच्या 'आशिष चंचलानी वाइन्स' या यूट्यूब चॅनेलचे 28.3 दशलक्ष पेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत. तो दरमहा 115,000 ते 180,000 डॉलर कमावतो.
हर्ष बेनिवाल हे नाव प्रत्येक युट्यूब सर्फिंग करणाऱ्याला माहितीच असेल. हर्ष बेनीवालचे यूट्यूब चॅनलवर 15.1 दशलक्षाहून सबस्क्राइबर्स आहेत. हर्षची एकूण संपत्ती 2.2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 16 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
गौरव चौधरी युट्यूबरने टेक्निकल गुरुजी नावाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहून युट्यूबर धुमाकूळ घातला आहे. टेक्निकल गुरुजी चॅनलचे 22.1 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याची एकूण मालमत्ता 45 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे
प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम बीबी की वाइन्स चॅनेलद्वारे व्हिडिओ बनवत आहे. त्याने 2015 मध्ये त्यांचे यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याचे 25 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 3 दशलक्ष डॉलर (म्हणजे सुमारे 25 कोटी रुपये) होती.
खाण्या पिण्याच्या वस्तूंविषयी तुम्ही युट्यूबवर काही सर्च केले की निशा मधुलिका हेच नाव पहिले येते. निशा मधुलिका चॅनेलवर 13.2 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत आणि यातून त्या खूप कमाई करतात.
CarryMinati चे दोन यूट्यूब चॅनेल आहेत. त्याच्या एका चॅनेलवर 35 दशलक्षाहून अधिक तर दुसऱ्या चॅनेलवर 9.3 दशलक्ष सबस्क्राबर आहेत. कॅरीकडे 3.5 दशलक्ष डॉलर (सुमारे 26 कोटी रुपये) एवढी संपत्ती आहे.