जानेवारी 2007 मध्ये स्टिव्ह जॉब्सने कॅलिफॉर्नियात Apple आयफोन लॉन्च केला.
जगातल्या पहिल्या आयफोनची किंमत काय होती? कोणी खरेदी केला होता? तुम्हाला माहिती आहे का?
9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरिज लॉन्च होतेय.
फर्स्ट जनरेशन आयफोन आताच्या तुलनेत खूप वेगळा होता.
फर्स्ट जनरेशन आयफोनमध्ये 4.5 इंचचा डिस्प्ले मिळायचा. 2018 मध्ये कंपनीने आयफोन एक्सएस मॅक्समध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले दिला होता.
आयफोन 15 मध्ये 6.7 इंचाची स्क्रिन मिळते.
ग्रेग पॅकरने जगातील पहिला आयफोन खरेदी केला होता. ते माजी हायवे मेंटेनंन्स वर्कर होते.
त्यांनी 29 जून रोजी मॅनहेथॉनच्या पाचव्या माळ्यावरील अॅपल स्टोअरमधून आयफोन खरेदी केला. यानंतर आजतागायत 2 बिलियन आयफोन विकले गेले आहेत.
सर्वात आधी आयफोनची किंमत 499 डॉलर म्हणजेच साधारण 35 हजार रुपये इतकी होती. ज्यामध्ये 4 जीबी स्टोरेज मिळत होते.
यानंतर 8 जीबी स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 599 डॉलर म्हणजेच 42 हजार रुपये इतकी होती.