फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फोनमध्ये 7.8 इंच 2K इनर AMOLED डिस्प्ले देऊ शकते. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

डिस्प्ले

फोनच्या बाहेरील AMOLED डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर ते 6.31 इंच असू शकते. फोनमध्ये ऑफर केलेले दोन्ही डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतील.

स्टोरेज

OnePlus चा हा फोन 16 GB LPDDR5x रॅम आणि 256 GB UFS4.0 अंतर्गत स्टोरेजच्या ऑप्शन पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

कॅमेरा

फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, अशी माहिती फिरते आहे की हा फोन 48 मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स, 48 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्सचा आहे.

बॅटरी

फोनची बॅटरी 4800mAh असेल. ही बॅटरी 67 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 13 वर आधारित Oxygen OS 13.1 वर काम करेल.

प्री-रिझर्व पासची विक्री

कंपनीने OnePlus Open प्री-रिझर्व पासची विक्री देखील सुरू केली आहे. या पासची किंमत 5000 रुपये आहे. पास विकत घेतल्यास, तुम्ही मुंबईतील OnePlus Open च्या जागतिक लॉन्च इव्हेंटसाठी विशेष आमंत्रण मिळवू शकता.

किंमत किती?

वन प्लसच्या ओपन फोल्डेबल फोनची किंमत 1,39,999 रुपये असू शकते. मात्र, ही किंमत लॉन्च झाल्यानंतरच निश्चित होईल. या फोनची पहिली विक्री 27 ऑक्टोबरपासून सुरु होईल. (सर्व फोटो - सोशल मीडियावरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story