ऑक्टोबर महिना प्रवासी वाहनांसाठी फार चांगला ठरला आहे. मारुती सुझुकीने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मारुतीने जवळपास 1.99 लाख वाहनांची विक्री केली. इतर ब्रँडनेही चांगली कामगिरी केली आहे.
Maruti Brezza पाचवी सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. या कारच्या विक्रीत 61 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने एकूण 16,050 युनिट्सची विक्री केली आहे.
मारुती सुझुकीची प्रीमियम हॅचबॅक Baleno विक्रीत चौथ्या क्रमांकावर राहिली. या कारच्या एकूण 16,594 युनिट्सची विक्री झाली आहे.
टाटा नेक्सॉनचं नवं व्हर्जन लाँच होताच तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. कंपनीने एकूण 16 हजार 887 युनिट्सची विक्री केली.
Maruti Swift च्या नेक्स्ट जनरेशनला लाँच करण्याची तयारी सुरु आहे. पण त्याआधी ती दुसऱ्या क्रमांकाची बेस्ट सेलिंग कार झाली आहे. याच्या एकूण 20,598 युनिट्सची विक्री झाली असून 20 टक्क्यांची वाढ दिसली आहे.
पहिल्या क्रमांकावर Maruti Wagon R आहे. सर्वसामान्यांना परवडणारी कार म्हणून ओळख असणाऱ्या Maruti Wagon R च्या 22 हजार 80 युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली आहे.