भारतीय बाजारपेठेत जास्त सीट्स आणि स्पेस असणाऱ्या गाड्यांची नेहमीच मागणी असते. यामध्ये एमपीव्ही कारना सर्वाधिक पसंती दिली जाते.
भारतात या सेगमेंटमध्ये जास्त कार नाहीत. पण या सेगमेंटमधील काही कार फारच लोकप्रिय आहेत. ऑक्टोबर महिन्यात अशाच एका एमपीव्हीची लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
कमी किंमत, चांगला स्पेस आणि कंपनी फिटेड सीएनजी पर्यायासह येणाऱ्या या कारने सर्वांनाच मागे टाकलं आहे. जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील बेस्ट सेलिंग एमपीव्ही कार्सबद्दल...
Renault Triber ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात 2080 युनिट्सची विक्री केली. मागील ऑक्टोबर महिन्यात 3199 युनिट्सची विक्री झाली होती. यावर्षी विक्री 35 टक्क्यांनी घटली आहे.
दक्षिण कोरियन कंपनी Kia ची नवी एमपीव्ही Carens लाही लोक पसंती देत आहेत. कंपनीच्या एकूण 5355 युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 5479 युनिट्सची विक्री केली होती.
Toyota Innova या सेगमेंटमध्ये खास लोकप्रिय आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात एकूण 8183 युनिट्सची विक्री केली आहे, ज्या मागील वर्षीच्या 3739 च्या तुलनेत 119 टक्के जास्त आहे.
Maruti Ertiga या सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पेट्रोलसह सीएनजी पर्यायासह येणाऱ्या कारच्या एकूण 14209 युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 10,494 युनिट्सची विक्री झाली होती.