देशातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा थार लवकरच एसयूव्हीचे 5 डोअर व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. पण गुपचूप महिंद्राने ही एसयूव्ही पूर्णपणे बदलून टाकली आहे.
15 ऑगस्ट रोजी कंपनी दक्षिण आफ्रिकेत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
यावेळी कंपनी भविष्यात लॉन्च होणाऱ्या कारचे प्रदर्शन करणार आहे.
या दरम्यान थार 5 डोअर तर दिसेलच पण त्याचेही नवे रूप दिसेल. ही थार बाजारात आल्यानंतर एसयूव्ही मार्केटचा खेळ पूर्णपणे बदलून जाईल.
महिंद्रा थारचे इलेक्ट्रिक कन्सेप्ट व्हेईकलही या कार्यक्रमात दाखवले जाणार आहे.
कंपनीने या कॉन्सेप्ट व्हेईकलचा कोणाला सुगावा लागू दिला नाही आणि आता ही कॉन्सेप्ट थेट दक्षिण आफ्रिकेत प्रदर्शित केली जाणार आहे.
आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. कार्यक्रमादरम्यान 5 डोअर थार देखील प्रदर्शित केली जाऊ शकतात. या SUV बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती.