नवा लूक, पॉवरफूल इंजिन; बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे KIA ची स्वस्त SUV

दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी हुंडईची प्रीमियम ब्रँड KIA ने 2019 मध्ये Seltos एसयुव्हीसह भारतीय बाजारात एंट्री केली होती.

फार कमी वेळेत KIA देशातील टॉप 5 बेस्ट सेलिंग कार ब्रँडमध्ये समाविष्ट झाली आहे.

इंटिरिअरपर्यंत सगळं बदलण्याची शक्यता

सेल्टॉस फेसलिफ्टच्याच धर्तीवर Sonet चा नवा अवतार फार अपेक्षा निर्माण करत आहे. कंपनी कारच्या एक्स्टिरिअरपासून ते आहे.

किया इंडियाने ऑगस्ट 2020 मध्ये सोनेट एसयुव्हीचा ग्लोबल डेब्यू भारतातूनच केला होता. आता 3 वर्षांनी या कारमध्ये मोठी अपडेट मिळणार आहे.

अपडेटेड किया सोनेटची चाचणी

जवळपास 1 वर्षांपासून अपडेटेड किया सोनेटची चाचणी सुरु आहे. यात नवा फ्रंट बंपर दिला जाणार आहे. याशिवाय नव्या डिझाइनचा हेडलँप, डे टाइम रनिंग लाइट्स आणखी आकर्षक असतील.

अलॉय व्हीलला नवं डिझाइन

टेस्टिंग कारच्या आधारे सांगितलं जात आहे की, यामधील क्रोम एलिमेंट्स आणि बॉडी क्लॅडिंगमध्ये बदल केला जाणार आहे. याशिवाय अलॉय व्हीललाही नवं डिझाइन दिलं जाऊ शकतं.

सेल्टोस फेसलिफ्टची स्क्रीन

नव्या सोनेटमध्ये नव्या स्विच गेअरसह डॅशबोर्ड लेआऊटमध्येही बदल केला जाणार आहे. यामध्ये सेल्टोस फेसलिफ्टची स्क्रीनही मिळू शकते.

इंजिनमध्ये कोणताही बदल न करण्याची शक्यता आहे. कारण नुकतंच इंजिनला बीएस 6 फेज 2 प्रमाणे अपडेट करण्यात आलं आहे.

इतर कंपन्यांना तगडी स्पर्धा

ही कार बाजारात हुंडई वेन्यू, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेजा आणि मारुती फ्रांक्स यांना स्पर्धा देणार आहे. कंपनीच्या सध्याच्या मॉडेलची किंमत 7.79 लाख आहे.

VIEW ALL

Read Next Story