भारत सरकार प्रसिद्ध अॅप टेलिग्रामसंबंधी तपास करणार आहे. यामध्ये अॅप आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी घडामोडींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ज्यामध्ये खंडणी, जुगार यांचा समावेश आहे.
भारतात गृह मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) द्वारे हा तपास केला जाऊ शकतो.
भारत सरकारच्या तपासाचं मुख्य लक्ष Peer-To-Peer (P2P) संभाषणांवर असेल. तसंच येथील बेकायदेशीर घडामोडींकडे लक्ष दिलं जाईल. वृत्तानुसार, चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
टेलिग्राम मेसेजिंग ॲपचा संस्थापक आणि सीईओ पावेल ड्यूरोवला शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. इलॉन मस्कसह अनेक लोक त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आणि काहींनी विरोधही केला.