Punch, Swift सर्व पिछाडीवर; ग्राहकांनी दणक्यात खरेदी केली 'ही' कार

जुलै महिना ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी फार चांगला राहिला नाही. अनेक कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट पाहायला मिळाली. तर काहींमध्ये थोडीशी वाढ झाली.

पण सर्वात मोठा बदल महिन्याच्या विक्रीत पाहायला मिळाला आहे. एका एसयुव्हीने Maruti Wagon R, टाटा पंच आणि स्विफ्ट सारख्या गाड्यांना मागे टाकलं आहे.

जुलैमध्ये ही कार देशातील सर्वाधिक विक्री झालेली ठरली आहे. जाणून घ्या जुलै महिन्यातील टॉप 5 बेस्ट सेलिंग कार

Maruti Ertiga - 8.69 लाख

मारुती अर्टिगा पाचव्या क्रमांकावर आहे. कारच्या 15,701 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या 14,352 युनिट्सच्या तुलनेत विक्री 9 टक्के जास्त आहे.

Tata Punch - 6.13 लाख

टाटा पंच घसरुन चौथ्या क्रमांकावर दाखल झाली आहे. जुलै महिन्यात 16,121 युनिट्सची विक्री झाली. गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या 12,019 च्या तुलनेत 34 टक्के वाढ झाली आहे.

Maruti Wagon R - 5.54 लाख

Maruti Wagon R 16,191 युनिट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गतवर्षी जुलै महिन्यात कारच्या 12,970 युनिट्सची विक्री झाली होती. यावर्षी झालेली विक्री 25 टक्के जास्त आहे.

Maruti Swift - 6.49 लाख

नुकतीच लाँच झालेली स्विफ्ट दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. याच्या एकूण 16,854 युनिट्सची विक्री झाली. गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या 17,896 युनिट्सच्या तुलनेत ही विक्री 6 टक्के कमी आहे.

Hyundai Creta - 11 लाख

हुंडाई क्रेटाने सगळा गेमच पालटला असून 17,350 युनिटसह जुलै महिन्यात बेस्ट सेलिंग कार ठरली आहे. गतवर्षी कारच्या 14,062 युनिट्सची विक्री झाली होती. ही विक्री 23 टक्के जास्त आहे.

VIEW ALL

Read Next Story