तुम्हाला माहित आहे का तुमचा स्मार्टफोनसुद्धा टीव्ही रिमोट बनू शकतो

तुम्ही Google TV अॅप वापरून टीव्ही नियंत्रित करू शकता किंवा Android फोनचे IR ब्लास्टर फीचर सुद्धा वापरू शकता.

तुमचा फोनमध्ये Google TV अॅप नसेल तर गुगल प्ले स्टोअरवरून वरून डाउनलोड करा.

Google Tv अॅप उघडा आणि खाली दिलेल्या Remote ऑप्शन वर क्लिक करा. तुमचा फोन Device शोधण्यास सुरूवात करेल आणि त्यानंतर तुम्ही Device कनेक्ट करा.

तुमचा फोन आणि टीव्हीवर दिसत असलेल्या पेअरिंग सूचना पाहा आणि फॉलो करा. एकदा फोन आणि टीव्ही कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही फोन Remote म्हणून वापरू शकता.

बहुतेक Android फोनमध्ये IR ब्लास्टर हे फीचर असतं. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे ऑपरेट करू शकता.

तुमच्या फोनमध्ये Remote कंट्रोल ॲप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.

अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये सेटअप करा. आता अॅपमध्ये तुमचे Device निवडा आणि तुमचा टीव्ही कनेक्ट करा

एकदा मोबाईल टीव्ही जोडल्या गेल्यानंतर तुम्ही मोबाईल रिमोटप्रमाणेच ते वापरू शकता.

VIEW ALL

Read Next Story