Gmail Full

Gmail स्टोरेज Full झालंय? काहीही न करता मोफत मिळवा 4000 GB पर्यंतचं स्टोरेज

Android फोन

Android फोन वापरणारी मंडळी तर, जीमेल अकाऊंटशिवाय फोन वापरुच शकत नाहीत अशा काही तरतुदीही तयार करण्यात आल्या. अशा जीमेलकडून तीन विभागात सेवा दिली जाते.

प्रायमरी, सोशल आणि प्रमोशन....

प्रायमरी, सोशल आणि प्रमोशन हेच ते तीन विभाग. तुम्हाला माहितीये का जीमेलमध्ये असं अल्गोरिदम आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीशी जोडला गेलात तर तुम्हाला त्याचे अपडेट मेलवर येऊ लागतात.

ईमेल आयडी

एखाद्या वस्तूची किंवा उपकरणाची खरेदी करताना तुम्ही जेव्हा तुमचा ईमेल आयडी समोरच्या व्यक्तीला देता तेव्हा तो कंपनीकडे सेव्ह राहतो आणि तुम्हाला त्यासंदर्भातील अपडेट्स मेलवर पाठवले जाकात.

असंख्य मेल...

बँकेचे मेल, खरेदीचे मेल, नोकरीचे मेल असे एक ना अनेक मेल, Google चे नोटिफिकेशन आपल्याला येत जातात आणि ही यादी मोठीच होत जाते. परिणामी जीमेलचं 15 जीबीचं स्टोरेज फुल्ल होतं.

स्टोरेज वाढवण्याच्या हेतूनं...

अनेकदा स्टोरेज वाढवण्याच्या हेतूनं आपण प्रायमरी विभागातील मेल डिलीट करतो. पण, सोशल आणि प्रमोशन विभागातील मेलकडे आपली नजर जात नाही. पण, इथूनच मेलबॉक्स भरतो.

स्टोरेज फुल्ल झाला आहे का?

तुमच्याही मेलबॉक्सचा स्टोरेज फुल्ल झाला आहे का? एक शक्कल लढवत तुम्ही 4TB म्हणजेच जवळपास 4000 जीबीपर्यंतचं स्टोरेज मिळवू शकता.

Playbook.com

यासाठी तुम्ही Playbook.com वर जाणं अपेक्षित आहे. हे एक व्हिज्युअल क्लाऊड स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे, जिथं तुम्ही जीमेलनं लॉगईन करताच लगेच तुम्हाला 100 जीबी स्टोरेज मोफत मिळेल.

4TB स्टोरेज...

तुम्हाला 4TB स्टोरेज हवं असल्यास आर्टिस्ट अँड डिझायनर हा प्लान निवडा. इथं तुम्ही सोशल मीडिया हँडल देणं अपेक्षित असेल. असं केल्यास तुम्हाला अगदी मोफक स्वरुपात 4000जीबी स्पेस मिळेल. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भा आणि अपडेट्सवर आधारित असून, झी 24 तास सुरक्षिततेची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story