Google अकाऊंट पासवर्ड विसरलात? 'या' स्टेप्सने करा रिकव्हर

गुगल अकाऊंटचा पासवर्ड विसरलात आणि लॉग इन करू शकत नाही? असं तुमच्यासोबत झालं असेल तर काळजी करु नका. पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही पासवर्ड रिकव्हर करु शकता.

Pravin Dabholkar
Jul 30,2023

अधिकृत वेबसाइट

अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही पासवर्ड रिकव्हर करु शकता.

अधिकृत वेबसाइट

सर्वप्रथम https://accounts.google.com/ वर जा.

जीमेल अ‍ॅड्रेस

त्यानंतर तुम्हाला तुमचा जीमेल अ‍ॅड्रेस टाकावा लागेल.

क्लिक करा

आता Forgot Password वर क्लिक करा.

नोटिफिकेशन येईल.

तुमच्‍या Android डिव्‍हाइसवर तुमच्‍याकडे आधीपासूनच गुगल खाते सेट असेल तेथे नोटिफिकेशन येईल.

येथे क्लिक करा

यामध्ये तुम्हाला Yes, it's me वर क्लिक करावे लागेल.

नवीन पासवर्ड

त्यानंतर तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकाल.

VIEW ALL

Read Next Story