Whatsapp वर हव्या त्या लोकांनाच Online दिसाल; फक्त बदला 'ही' Setting

सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग App

व्हॉट्सअप हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग App आहे. भारतामध्येही कोट्यवधी लोक हे App वापरतात.

फारशी माहिती नसते

खरं तर व्हॉट्सअप अनेक अशा सेटिंग्स आहेत ज्याबद्दल सर्वसामान्य युझर्सला फारशी माहिती नव्हती.

हाइड करा...

असेच व्हॉट्सअपचे एक फिचर म्हणजे ऑनलाइन आहे की नाही हे युझर्सला हाइड करता येण्यासंदर्भातील.

ऑनलाइन दिसतो

सामान्यपणे जेव्हा कोणताही युझर व्हॉट्सअपवर सक्रीय असतो तेव्हा तो सर्वांना ऑनलाइन दिसतो.

...तरी इतरांना समजतं

तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप सेटींगमधील लास्ट सीनचा पर्याय बंद करुन ठेवला असला तरी तुम्ही ऑनलाइन दिसता आणि इतरांना हे समजतं.

आता हक्क युझर्सकडे...

मात्र आपण ऑनलाइन आहोत की नाही हे कोणाला दिसावं आणि कोणाला नाही यासंदर्भातील हक्क आता व्हॉट्सअपने युझर्सला दिलेत.

कसा कराल बदल?

ही सेटींग बदलण्यासाठी आधी तुम्हाला व्हॉट्सअप सुरु करावं लागेल. व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसी पर्याय निवडावा.

प्रायव्हसी सेटिंगमध्ये...

प्रायव्हसी सेटिंगमध्ये अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी लास्ट सीन अॅण्ड ऑनलाइन हा पर्याय निवडा.

2 वेगवेगळे पर्याय

लास्ट सीन अॅण्ड ऑनलाइन पर्यायामध्ये 2 वेगवेगळे पर्याय म्हणजे लास्ट सीन आणि ऑनलाइनसाठी उपलब्ध आहेत.

यापैकी एक करता येईल

ऑनलाइन स्टेटससाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत. एकतर तुम्ही कॉनटॅक्ट लिस्टमधील सर्वांना ऑनलाइन दिसाल किंवा लास्ट सीनच्या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही कधी ऑनलाइन आहात हे लपवू शकाल.

लास्ट सीन सेटिंगमध्ये जा आणि...

तुम्हाला एखाद्या ठराविक व्यक्तीपासून तुम्ही ऑनलाइन आहात की नाही हे लपवायचं असेल तर लास्ट सीन सेटिंगमध्ये जाऊन माय कॉनटॅक्स एसपेक्ट (My Contact Except) हा पर्याय निवडून त्यामध्ये ज्याच्यापासून माहिती लपवायची आहे त्यांची नावं निवडावी.

नकोश्या लोकांपासून लपवा माहिती

या माध्यमातून तुम्हाला नकोश्या वाटणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही ऑनलाइन आहात की नाही ही माहिती लपून ठेवता येईल.

हा तोटा लक्षात घ्या

मात्र तुम्ही ज्याच्यापासून स्वत: ऑनलाइन आहात की नाही हे लपवणारा त्याचं ऑनलाइन स्टेटसही तुम्हाला दिसणार नाही.

VIEW ALL

Read Next Story