जर तुम्हाला हे कॉल्स बंद करायचे असतील तर Android फोनवर एक खास सेटिंग असते. या सेटिंगच्या मदतीने तुम्ही Spam Calls टाळू शकता.
सेटिंगमध्ये एक बदल केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर येणारे Spam Calls आपोआप बंद होतील. त्याबद्दलच जाणून घेऊयात.
येथे तुम्हाला सेटिंगवर क्लिक करावं लागेल. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे Caller ID आणि Spam चा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय असतील. येथे तुम्हाला स्पॅम क्रमांकाची ओळख करुन देणारी सेटिंग ऑन करावी लागेल.
यानंतर तुम्हाला Spam Calls ला फिल्टर करणारा पर्याय निवडावा लागेल. अशाने तुम्ही सहजपणे Spam Calls रोखू शकता.
पण जर एखादा फोन नंबर स्पॅम मार्क नसेल तर फोन त्याला ब्लॉक करणार नाही. तसंच हे फिचर ऑन केल्यानंतर काही गरजेचे कॉलही ब्लॉक होण्याची भीती असते.