मोबाइल चोरी झाल्यानंतर सिमकार्ड देखील नवीन खरेदी करावे लागते.
सिम कार्ड घेण्यासाठी पुन्हा सगळे कागदपत्र देऊन व्हेरिफाय केले जातात. त्यानंतरच नवीन सिमकार्ड येते.
सुरुवातीला सिम कार्ड खरेदी करण्यासाठी २-४ दिवसांचा कालावधी लागायचा
मात्र आता आधार कार्ड देऊनही सिम कार्ड खरेदी करता येते.
पण एका आधारकार्डवर तुम्ही किती सिम खरेदी करु शकता हे तुम्हाला माहितीये का?
एका आधारकार्डवर तुम्ही 9 सिम कार्ड खरेदी करु शकता.
अनेकदा तुमच्या ओळखीतील लोक कागदपत्रांचा गैरवापर करु शकतात. त्यामुळं तुम्ही आधार कार्डचा वापर करुन तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे तपासू शकता.
त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारकार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे.