UPI वापरणाऱ्या HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! बँकेची 'ही' सेवा कायमची बंद

Swapnil Ghangale
Jun 24,2024

मोठा नियम बदलला

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने ग्राहकांसंदर्भात एक मोठा नियम बदलला आहे.

बदल तुमच्या लक्षात येणं आवश्यक

तुमचं एचडीएफसी बँकेत खातं असेल आणि तुम्ही ते युपीआयशी लिंक केलं असेल तर बँकेने नुकताच बदलेला एक महत्त्वाचा नियम तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे.

या रक्कमेसंदर्भातील व्यवहारांचा नियम बदलला

समोर आलेल्या माहितीनुसार, 100 रुपयांहून कमी रकमेच्या युपीआय व्यवहार आणि 500 रुपयांहून कमी रक्कम डिपॉझिट करण्यासंर्भातील एक महत्त्वाचा नियम एचडीएफसी बँकेने बदलला आहे.

25 जून 2024 पासून लागू होणार

एचडीएफसी बँकेने नियमामध्ये केला हा बदल 25 जून 2024 पासून लागू होणार आहे. तसं बँकेने ग्राहकांना कळवलं आहे.

ग्राहकांच्या सल्ल्यानेच बदल

बँकेने ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतरच नियम बदलण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आहे. मात्र नेमका कोणता नियम बँकेने बदललाय असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

नेमका बदल काय?

तर एचडीएफसी बँकेने यापुढे 100 रुपयांहून कमी पैशांच्या व्यवहारासाठी किंवा 500 रुपयांहून कमी डिपॉझिटसाठी आता बँकेकडून एसएमएस अलर्ट न पाठवण्याचं निश्चित केलं आहे. या दोन्हींसाठी आत एसएमएस अलर्ट येणार नाहीत, असं बँकेने स्पष्ट केलं आहे.

बँकेनं केलं आवाहन

मात्र ई-मेलवरुन यासंदर्भातील अपडेट्स मिळत राहतील त्यामुळेच आपला ई-मेल आयडी अपडेट करुन घेण्याचं आवाहन बँकेने ग्राहकांना केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story