हे सरकारी 5 अ‍ॅप्स आहेत उपयोगाचे, आत्ताच इन्स्टॉल करा

या काही सरकारी अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे.

ज्यामुळे तुमचा वेळ तर वाचेलच शिवाय सरकारी कार्यालयात जाण्याचा त्रास देखील राहणार नाही.

डिजीलॅाकर (Digilocker)

डिजीलॉकरमध्ये तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि शाळा-कॉलेजची मार्कशीट डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवू शकता.

GST दर शोधक

या ॲपद्वारे कोणत्याही उत्पादनावर किंवा सेवेवर लागू होणारा GST दर सहजपणे जाणून घेऊ शकतो. हे ॲप व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर आहे.

मोबाईल पासपोर्ट सेवा

या ॲपमध्ये तुम्ही पासपोर्ट संबंधित सर्व आवश्यक माहिती किंवा पासपोर्ट अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतो.

मेरी सरकार

हे ॲप सरकार आणि नागरिकांमधील संवादाचे अंतर कमी करण्यासाठी आहे. याद्वारे तुम्हाला सरकारी योजना, धोरणे आणि मोहिमांची माहिती मिळू शकते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सूचना आणि मत सरकारला कळवू शकता.

उमंग

हे ॲप शेकडो सरकारी सेवा एकाच ठिकाणी आणते. यावर तुम्ही आधार, पॅन, गॅस बुकिंग, मोबाईल बिल पेमेंट, पाणी आणि वीज बिल भरणा यांसारख्या अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story