फोन नेहमी 100 टक्क्यांपर्यंत चार्ज ठेवणे योग्य नाही. म्हणूनच तुम्ही तो फक्त 80-90 टक्के चार्ज ठेवणे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दिवसभर फोन वापरायचा आहे म्हणून सतत चार्जिंग करत राहणे योग्य नाही. तसेच 0 टक्के बॅटरी झाल्यावर चार्जिंगला लावणे हे देखील बॅटरीसाठी घातक ठरते.
मोबाईलसोबतच तो वेळोवेळी चार्ज करणेही आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर फोन चार्ज केला नाही तर फोन लवकर खराब होण्याचीही शक्यता असते.
स्मार्टफोनमध्ये सापडलेला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर इतका स्मार्ट आहे की मोबाइलची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर मोबाईल चार्ज होणे थांबते. यानंतर, बॅटरी 90 टक्क्यांपर्यंत पोहोचताच ती पुन्हा चार्ज होऊ लागते.
मात्र जुन्या मोबाइल फोनच्या बाबतीत असे होत नाही. पण आता स्मार्टफोनमध्ये असे चार्जिंग सर्किट आहे
फोनला स्मार्टफोन असेच म्हणत नाही. 100 टक्के चार्जिंग होताच तुमचा स्मार्टफोन चार्जिंग थांबवतो.
बरेच लोक रात्री फोन चार्जिंगला लावून झोपून जातात. फोन रात्री पूर्ण चार्ज होतो आणि नंतर तो दिवसभर वापरला जातो. मात्र फोन चार्जिंगसाठी सहा ते सात तास लागत नाही.