गर्मी वाढत असल्याने AC चा वापरही वाढत आहे. खासकरुन प्रवास करताना गाडीत जेव्हा एसीचा वापर केला जातो तेव्हा लोकांना अनेक प्रश्न सतावत असतात.
अनेक लोक कारमध्ये प्रवास करताना AC च्या फॅनचा स्पीड वाढवताना फार विचार करतात. कारण याचा परिणाम कारच्या मायलेजवर पडतो असं त्यांना वाटतं.
पण खऱंच कारमधील AC च्या फॅनचा स्पीड वाढवल्याने कारच्या मायलेजवर फरक पडतो का? समजून घ्या...
सर्वात आधी समजून घ्या की, कारच्या AC चं मेकॅनिझम पूर्पणणे इंजिनशी जोडलेलं असतं. यामुळे AC च्या वापराचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो.
जेव्हा AC सुरु केला जातो तेव्हा त्याचं इंजिनिवर अतिरिक्त ओझं पडतं. एसी कंप्रेसरमुळे हे होतं. हे इंजिनकडून बेल्टच्या माध्यमातून चालवलं जातं. कंप्रेसर चालवण्यासाठी एनर्जीची गरज असते जी थेट इंजिनकडून मिळते.
पण AC चा फॅन कारची बॅटरी म्हणजेच इलेक्ट्रिकेल कंपोनंटशी जोडलेली असते. जे फक्त हवेला केबिनच्या आता प्रसारित करण्याचं काम करतं.
AC च्या फॅनला बॅटरीपासून ऊर्जा मिळते. त्यामुळे तो कमी, जास्त केल्याने कारच्या मायलेजवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजेच तुम्ही एसी 1 वर ठेवा किंवा 4 वर, तुमचं तितकंच इंधन जाणार आहे.