Renault Triber च्या खरेदीवर तुम्ही 50 हजारांची बचत करु शकता. ज्यामध्ये 20 हजार रुपये कॅश बेनिफिट, 20 हजारांचा एक्स्चेंज बोनस आणि 10 हजारांचा अतिरिक्त लॉयल्टी बोनस आहे.
याशिवाय कॉर्पोरेट डिस्काऊंट म्हणून 12 हजारांची सूट आणि ग्रामीण भागांसाठी 5 हजारांचा डिस्काऊंट दिला जात आहे.
या ग्रामीण ऑफरचा लाभ शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य घेऊ शकतात. पण यासाठी Renault कडून देण्यात आलेली कागदपत्रं हवीत. Triber वर मिळणारी ही ऑफर व्हेरिटंयनुसार वेगळी आहे.
RXE व्हेरियंटवर कंपनी फक्त लॉयल्टी बोनस देत आहे. या व्हेरियंटवर ग्राहकांना कॅश, एक्स्चेंज ऑफरचा लाभ मिळणार नाही. तर अर्बन नाइट एडिशनवर केवळ लॉयल्टी आणि एक्स्चेंज बोनस दिला जात आहे.
Renault Triber एकूण चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. हिची किंमत 6.33 लाखांपासून ते 8.97 लाखांदरम्यान आहे. ही कार लीटरमागे 19 किमीचा मायलेज देते.