3 महिने फ्री पाहता येणार Disney+ Hotstar, काय आहे ही ऑफर?

Disney+ Hotstar तीन महिन्यांपर्यंत फ्रीमध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. एका कंपनीने ही खास ऑफर जारी केली आहे.

Disney+ Hotstarचे सबस्क्रिप्शन जवळपास सगळ्याच टेलीकॉम कंपन्याकडून ऑफर केले जात होते. मात्र नंतर काही कंपन्यांनी मोबाइल सब्सक्रिप्शन देणं सुरू केलं.

आता टेलीकॉम कंपन्यांकडून OTT प्लेटफॉर्मचे अॅक्सेस फ्रीमध्ये मिळतोय. वोडाफोन- आयडिया (VI)कडूनही काही प्लान्समध्ये Disney+ Hotstar Mobileचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे.

कंपनीने अलीकडेच एका प्लानमध्ये OTTचं सब्सक्रिप्शन देऊ केलं आहे. VIच्या 839च्या प्लानमध्ये Disney+ Hotstar Mobileचे सब्सक्रिप्शन मिळत आहे.

या प्लानमध्ये युजर्सना अनेक फायदे मिळणार आहेत. त्याचबरोबर तीन महिन्यांसाठी Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शनदेखील मिळणार आहे.

VI ऑफर एक्सक्लुझिव आहे. म्हणजे जे युजर्स अॅपच्या माध्यमातून रिजार्ज करतील त्यांनाच हे लाभ मिळणार आहेत.

या प्लानमध्ये युजर्सना 84 दिवसांची व्हॅलिटिडी मिळणार आहेत. तर रोज 2 जीबी इंटरनेट डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMSचा अॅक्सेस मिळेल.

या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना Binge All Night, 2 GB मंथली बॅकअप डेटा आणि विकेंड डेंटासारख्या सुविधाही मिळणार आहेत

युजर्सना VI Movies & Tvचा फ्री अॅक्सेसदेखील मिळणार आहे. म्हणजेच या प्लानमध्ये डेटा, कॉलिंग, OTTसह अन्य फायदेही मिळणार आहेत.

कंपनी 399 आणि 499 रुपयांच्या प्लानमध्येही Disney+ Hotstarचा तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन ऑफर करत आहेत. मात्र या प्लानची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे.

VIEW ALL

Read Next Story