iPhone 14 Plus वर तब्बल 18,900 रुपयांचा बंपर डिस्काऊंट, कुठे आणि कधी? जाणून घ्या

iPhone ची प्रसिद्धी आता काही लपलेली नाही. कंपनी दरवर्षी नवी सीरीज लाँच केल्यानंतर जुने हँडसेट स्वस्त करते. तसंच जास्त जुन्या झालेल्या सीरिज बंद करते.

iPhone 14 Plus वर डिस्काऊंट

दरम्यान जर तुम्ही iPhone 14 Plus खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. यावर तब्बल 18 हजार 900 रुपयांचा बंपर डिस्काऊंट मिळत आहे.

Flipkart वर सेल

दसऱ्याच्या निमित्ताने फ्लिपकार्टवर सेल सुरु आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरु असणार आहे. या सेलमध्ये iPhone 14 Plus वर डिस्काऊंट मिळत आहे.

फ्लिपकार्टवर लिस्टेड

फ्लिपकार्टच्या सेल बॅनरवर iPhone 14 Plus वर 60 हजार 999 रुपयांच्या डीलसह लिस्टेड करण्यात आलं आहे.

डिस्काऊंट किती?

iPhone 14 Plus ला फ्लिपकार्टवरुन खरेदी केल्यास 18 हजार 900 रुपये वाचवण्याची संधी मिळेल. Apple.com वर iPhone 14 Plus 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 79900 रुपये आहे.

फिचर्स

iPhone 14 Plus मध्ये 6.68 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनवर शार्प डिटेल्स आणि व्हायब्रंट कलर्स मिळतात.

कॅमेरा

iPhone 14 Plus मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 12MP - 12MP चे दोन कॅमेरा सेन्सर आहेत. याच्या मदतीने अल्ट्रा वाइड अँगल फोटो आणि पोट्रेट मोडचा फोटो क्लिक करु शकतो. फ्रंटलाही 12MP कॅमेरा देण्यात आला आहे.

फास्ट चार्जिंग

iPhone 14 Plus मध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. जर याला 20W च्या अॅडप्टरने चार्ज केलं तर 30 मिनिटात 50 टक्के बॅटरी चार्ज होते. यामध्ये 15W चा वायरलेस चार्जिंगही मिळतो.

दमदार बॅटरी बॅकअप

या हँडसेटमध्ये 26 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाइम मिळतो. म्हणजेच तुम्ही 20 तासांपर्यंत व्हिडीओ स्ट्रिमिंगचा फायदा उचलू शकता. यामध्ये 100 तासांचा ऑडिओ प्लेबॅक टाइम आहे.

VIEW ALL

Read Next Story