4 लाखाच्या आत कार शोधणाऱ्यांसाठी 'टॉप 5' पर्याय!

Pravin Dabholkar
Feb 11,2024

कारच्या किंमती

घरात एक कार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कारच्या किंमती पाहून कोणी हा विचार करायला मागत नाही.

कमी बजेट

अनेकजण कमी बजेटमध्ये जास्त फिचर्स असलेल्या कार्सच्या शोधात असतात. तुम्हीही त्यातील एक असाल तर 4 लाखांच्या आत येणाऱ्या 5 कार्सबद्दल जाणून घेऊया.


या कार्सची किंमतही कमी आहे, त्यात या आकारानेही लहान असल्याने ट्रॅफीकमध्ये तुम्हाला याची मदत होईल. तसेच यात सेफ्टीची विशेष काळजीदेखील घेण्यात आली आहे.

मारुती सुझूकी स्विफ्ट

मारुती सुझूकी स्विफ्ट 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.3 लिटर डिझेल इंजिनमध्ये आहे. 2012 ते 2016 चे मॉडेल तुम्हाला 4 लाखाच्या आत मिळून जाईल.

ह्युंडाई ग्रॅण्ड आय10

शहरात चालवण्यासाठी बेस्ट आणि चालवायला खूप सोपी गाडी. पेट्रोल इंजिनला टॉर्च कन्व्हर्टर अॅटोमॅटीक ऑप्शनसह मिळेल. 2014 ते 2018 चे मॉडेल बजेटमध्ये मिळेल.

मारुती सुझूकी वॅगनर R

देशातील सर्वाधिक विकली गेलेली कार. AMT आणि CNG पर्यायासह येते. 2013 ते 2018 तील मॉडेल कमी किंमतीत मिळेल. याचा मेंटेनन्सदेखील परवडणारा असतो.

होंडा Brio

होडांने त्यांची सर्वात लहान कार Brio च्या रुपात बाजारात आणली. पण हिला लोकांकडून हवी तशी मागणी मिळाली नाही. 2013 ते 2015 च्या या गाडीचे मॉडेल तुम्हाला 3 लाखापर्यंत मिळू शकेल.

मारुती सुझूकी Ignis

ही कार भारतात जास्त चर्चेत आली नाही. 2017 ते 2019 मध्ये रस्त्यावर दिसलेली ही कार 4 लाखाच्या आत मिळू शकते.

VIEW ALL

Read Next Story