नवा स्मार्टफोन घेतल्यावर 'या' 5 गोष्टी कराच

नवीन स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात करण्याआधी 5 गोष्टी आर्जून केल्या पाहिजे. त्या कोणत्या हे पाहूयात...

अनेक अडचणी होतील दूर

हल्ली अनेक लोक 2 ते 3 वर्षांनी फोन बदलतात. फोन अपडेट केल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अनेक अडचणी सहज दूर होतील.

नवीन फोन विकत घेतल्यानंतर हे कराच

आपण अशाच 5 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येकाने नवीन फोन विकत घेतल्यानंतर केल्याच पाहिजेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दल...

1) बिल आणि बॉक्स संभाळून ठेवा

नवीन फोन घेतल्यानंतर त्याचं बिल आणि बॉक्स नक्की जपून ठेवा. बिल हे फोनच्या वॉरंटीसाठी महत्त्वाचं असतं.

बॉक्स आणि बिलवरचा तो क्रमांक महत्त्वाचा

तसेच बिलाबरोबरच मोबाईलच्या बॉक्सवरही IMEI क्रमांक असतो. या क्रमांकाच्या माध्यमातून फोनची सर्व माहिती मिळते. त्यामुळे दोन्ही गोष्टी जपून ठेवा.

2) कव्हर लावा

फोनच्या अतिरिक्त सुरक्षेसाठी फोनला कव्हर आणि स्क्रीन गार्ड आवश्यक लावावं. फोन वापरण्याची पद्धत फार रफ असेल तर या दोन गोष्टी आवश्यक आहेत.

...म्हणून कव्हर आणि स्क्रीन गार्ड महत्त्वाचं

फोनवर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅच पडू नये, स्क्रीन खराब होऊ नये म्हणून स्क्रीन गार्ड आणि कव्हर महत्त्वाचं असतं.

3) सॉफ्टवेअर अपडेट करा

फोन सुरु केल्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट करुन घ्या. कारण कंपन्या नव्या फोनसंदर्भात अनेक अपडेट्स देत असतात.

सॉफ्टवेअर अपडेट्सचा फायदा काय?

नव्या सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये बरेच नवे फिचर्स असतात. तसेच यामध्ये सिक्युरिटी पॅचही मिळतो.

4) विमा काढा

फार महागडा फोन घेतला असेल तर थोडे अजून पैसे घालून फोनचा विमा विकत घ्या. फोन चोरीला गेला, हरवला तर त्याची भरपाई विमा घेतली असेल तर सहज मिळते.

विमा नसेल घ्ययचा तर हा पर्याय निवडा

विमा घ्यायचा नसेल तर अतिरिक्त वॉरंटीचा पर्यायही तुम्ही निवडू शकता. हा पर्याय विम्यापेक्षा अधिक स्वस्त ठरतो.

5) क्लाऊड स्टोरेज

नव्या फोनमध्ये गुगल ड्राइव्ह आणि क्लाऊड स्टोरेज नक्की सेट करुन ठेवा.

क्लाऊडचा फायदा काय?

क्लाऊडवर डेटा सिंक केल्यास फोन हरवल्यानंतरही तुम्हाला तुमचा डेटा सुरक्षितपणे परत मिळू शकतो.

VIEW ALL

Read Next Story