युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली इंडिया चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पियन लीगच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय. अखेरच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने अलीकडेच त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम इलेव्हन क्रिकेट संघाची घोषणा केली.
ज्यात सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ॲडम गिलख्रिस्ट या फलंदाजांचा समावेश आहे.
तर गोलंदाजांमध्ये शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांचा समावेश आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स फायनलनंतर युवराजने आपली टीम सांगितली. त्यात युवराजने स्वतःला 12 वा खेळाडू म्हणून देखील समाविष्ट केलं.
युवराजच्या या घोषणेने क्रिकेट चाहते आणि तज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काहींनी एमएस धोनीसारख्या काही खेळाडूंना वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय.